Gulab Jamun | गुलाब जाम

Gulab Jamun in English

 

Read traditional way of preparing Gulab Jamun recipe in marathi. Explore ingredients & share your experience for maharashtrian Gulab Jamun.

वेळ: 

१ तास

२८-३० गुलाब जाम

gulab jamun

साहित्य:

 

 गुलाब जाम बनवण्यासाठी 

१) २ कप चुरलेला गुलाब जामचा मावा

२) १/४  कप मैदा

३) ३ मोठे चमचे दूध पावडर

४) चिमूठभर बेकिंग  पावडर

५) तूप तळनासाठी

साखरेचा पाक बनवण्यासाठी


१) ३ कप साखर

२) केसर

३) दीड कप पाणी

४) वेलची पूड

 

कृती:


साखरेचा पाक:

एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून १० मिनिटे मंद ग्यासवर पाक करावा.

 

सतत ढवळत राहवे.

 

साखर वितळली की ५ मिनिटे मंद ग्यासवर एक तारी पाक करून घ्या.

 

केसर घालून पाक बाजूला करून ठेवा.

 

 

 

 

gulab jamun2

गुलाब जाम:

 

एका मिक्सिंग बाउलमध्ये चुरलेला मावा, मैदा, दूध पावडर, चिमूठभर बेकिंग  पावडर घालून नरम मळून घ्या.

 

गोळे करताना हलुवार हाताने छोटे छोटे गोळे करून घ्या.

 

आवश्यक वाटल्यास तळ हाथावर तूप लावावे.

 

गोळ्यांना तडे जाणार नाही याची काळजी घ्यावी म्हणजे तळताना फुटणार नाही.

 

कढई मध्ये तूप गरम करून थोडे थोडे गुलाब जामुन गुलाबी रंगावर तळुन घ्या.

 

तूप जास्त गरम करू नये व ग्यास मंद ठेवावा म्हणजे गुलाब जाम आत कच्चे राहणार  नाही.

 

तळलेले गुलाब जाम साखरेच्या पाकात टाकून २-३ तास मुरु दयावे.

 

पाक जास्त गरम किंवा थंड नसावा.

 

gulab jamun 1

Newer Post
Older Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *