Ganesh Chaturthi

गणपती बाप्पा मोरया 

 

Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi

 

Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi

गणपती बाप्पा येणार अस म्हटल्यावर डोळ्यासमोर ऊभ राहत ते गणपती बाप्पाचे गोजिरवान रूप. त्याच्या स्वागतासाठी काय करू आणि काय नको असे असंख्य  प्रश्न पडतात. बाजारात केवडा, चाफा, मोगरा, तिराडा, जास्वंद अशी विविध प्रकारची फूल दिसू लगतात.  ढोल ताश्यांची जय्यत तयारी सुरु असते. बाप्पा येणार म्हणून घरात साफसफाई, माडीवरची जूनी तांब्या पितळेची भांडी काढून स्वच्छ धुवून पुसून ठेवणे, पूजेसाठी लागणारे चवरंग, पाट फुसुन रंगवून ठेवणे , अशी छोटी छोटी पण फार गंमतीशिर काम जी करण्यासाठी घरातल्या चिमुरड्यांपासून अगदी ८० वर्ष्याच्या आजीपर्यंत सर्व उत्सुक असतात.

Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi

 

^DA839A935DE9A9B62542B8C0D31289F91C34B01B90EDE44CF0^pimgpsh_fullsize_distr

 

किती गंमत असते ना एरवी पाहुणे येणार म्हटल्यावर घरातल्या गृहिणींना स्वीट आणि शॉर्ट काही करता येईल का? अस वाटत पण या पाहुण्याचे लाड किती पुरवू आणि त्याच्यासाठी त्याच्या आवडीच काय काय करू याची तयारी अगदी १५ -२० दिवस आधीच केलेली असते.  तो जर आपल्या घरी ५ दिवस राहिला तर त्याला ५ दिवस वेगवेगळे पदार्थ खावू घालावे अस प्रत्येक गृहिणीला वाटत.

माझ्या आईकडे गणपती बाप्पाच्या नैवेद्यात उकडीचे मोदक, तळणाचे  मोदक, खीर, सांदन, पातोळी, सातकप्पी घावन, पुरणाची पोळी, गोड गुळाची पोळी, खांडतोळी असे विविध पदार्थ बनतांत.  यासाठी लागणार तांदूळाच पीठ, तांदुळाचा रवा माझी आई जात्यावरच करते.   तिच्यासोबत बसून जात्यावर पीठ काढण्यासाठी मी आवर्जून बसायची आणि आजही बसते.  आईला चिवडा, लाडू आणि करंज्या बनविण्यात मदत करण.

Modak

Fried Modak

Sandan

Patolya Recipe

 

Besan Ladoo

 

बाजारात वडिलांसोबत जाण, नारळ, धूप, अगरबत्ती, बाप्पाची आवडती पाच फळ आणण याची मज्जा काही वेगळीच.  दादाला गणपतीबाप्पाच मकर बनवण्यात मदत करण, अरे हे अस लावल तर अधिक छान दिसेल असे सल्ले देण.  किती तयारी या बाप्पाच्या आगमनाची.

 

Ganesh chaturthi

Ganesh chaturthi

 

Ganesh chaturthi

Ganesh chaturthi

 

Ganesh chaturthi

Ganesh chaturthi

 

आज बाप्पा येणार म्हणून सकाळी लवकर उठून मैत्रिणींसोबत गार्डनमधून बाप्पाला आवडणारी दूर्वा, जास्वंदीची फूल काढून आणण, घरी आल्यावर त्या दुर्वांची २१ ची जुडी बनवण, ती पूजेच्या थाळीत ठेवण, मग २१ – २१ ची कापसाची वस्र बनवून त्यावर कुंकू लावून पुजेच्या थाळीत ठेवाण अशी छोटी छोटी पण मनाला आंनद देणारी काम. गणपती बाप्पाच्या स्वागताला चिकूने जमिण सारवन, त्यावर छान रांगोळी घालण अशी बरीचशी काम येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताला.   चला तर मग ताळ, मृदुंगाच्या नादात, फुलांचा वर्षावात करुया  स्वागत सर्व मिळून आपल्या गणपती बाप्पाचे.

बोला गणपती बाप्पा मोरया !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *