डाळ मेथी

Dal Methi in English 

Read traditional way of preparing Dal Methi recipe. Explore ingredients & share your experience for maharashtrian Dal Methi.


वेळ:  

२० मिनिटे  

२ व्यक्तींसाठी.


साहित्य:

 वाटी मेथीची भाजी 

  

 वाटि तुरिची डाळ  

 कांदा    

 ३-४ लसूण पाकळ्या 

  टोम्याटो

कोथिंबीर

 हिरव्या मिरच्या

हळद 

मीठ 

 

फोडणीसाठी :

/ छोटा चमचा जिरे 

/  छोटा चमचा मोहरी 

हींग चिमुठभर 

कढीपत्त्याची  पाने 


कृती:


तुरिची डाळ  प्रेशर कूकरला  लावून साधारण  शिट्ट्या काढाव्या.


मेथी धुवून चिरून घ्या.


कांदा,  टोमॅटो  हिरवी मिरची बारिक चिरून घ्या.

 


तुरीची डाळ चमच्याने ढवळून छान घोटून घ्या.


एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरीजिरेहींगकढीपत्तालसूण हिरव्या मिरच्या  बारिक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या

 

 

कांदा लालसर होईस्तोवर भाजून घ्या.


आता बारिक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत भाजा.

 

बारिक चिरलेली मेथी  घालून तेलावर ती शिजेपर्यंत परता साधारण १० मिनिटे. 


मेथी शिजला की घोटलेली डाळ त्यावर घाला.


मीठ घालून ढवळून घ्या.

 


उकळी आली की मंद ग्यासवर ५ मिनिटे शिजू दया.

 

वरुन कोथिंबीर व ओल खोबर घालून गरमच सर्व्ह  करावी. 

 

                           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *