Bail Pola

पोळा हा सण महाराष्ट्रात बैलपोळा म्हणून ओळखला जातो. हा सण श्रावण पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात. बैलाप्रती शेतकऱ्यांचे असलेले प्रेम, माया या सणातून व्यक्त होते. पोळ्याच्या दिवशी बैलाला अंघोळ घालून त्याला चारा खायला घालून घरी आणले जाते. या दिवशी बैलाला आराम दिला जातो, त्याच्याकडून कुठलही मेहनतीच काम करुन घेत नाही.

स्वच्छ केलेल्या बैलाच्या खोडाला तूपाने व हळदीने शेकले जाते. या दिवशी बैलाचा फारच थाट असतो, आपल्या घरचा असूनही त्याचा माण एका मोठ्या पाहुण्यासारखा असतो. त्याच्या अंगावर गेरुने सारवुन चुण्याचे किंवा रंगाचे ठिपके देणे किंवा नक्षी करणे हे काम घरातले बच्चे कंपनी करतात. घरतले  चिमुरडे आपला बैल आज गावत सर्वांत सुंदर दिसावा यासाठी धडपडत असतात आणि यासाठी लागणारी सर्व तयारी ते आवर्जून करत असतात. त्याच्या शिंगाणा  रंगवन, डोक्याला बाशिंग बंधाण, गळ्यात कुबड्यांची माळ, पायत किंवा गळ्यात घुंगरू घालन अशी बरीच तयारी सुरु असते.

गृहिणी जमीन सरवून त्यावर रांगोळी काढतात.  बऱ्याचश्या गावांमध्ये बैलपोळ्याच्या  दिवशी गावाच्या वेशीवर सर्व बैलजोड्या एकत्र येवून गाणी, ढोल ताश्यांनी बैलाचे स्वागत केले  जाते. त्यानंतर बैलाला मारोतीच्या देवळात नेल जात, नंतर बैलाला घरी आणून सुहासिनी आरतीने ओवाळून, पुरणपोळीचे नैवेद्य दिले जाते.

काही घरी मातीच्या बैलांचीसुद्धा पूजा केली जाते व त्यांनाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग आज सगळे मिळून पुरणपोळी खावून साजरा करूया बैलपोळा.

Adblock
detector