पालक राईस – Palak Rice

Palak Bhat in English

Read traditional way of preparing Palak Bhat recipe. Explore ingredients & share your experience for maharashtrian Palak Bhat.

वेळ:  

३० मिनिटे,

२ व्यक्तींसाठी.

साहित्य:

 

१) २ कप बासमती तांदूळ

२) साडे तीन कप पाणी

३) हळद

४) १ मध्यम आकाराचा कांदा

५) १ टोम्याटो

६) २ छोटे चमचे आल लसून पेस्ट

७) ३ मोठे चमचे तेल

८) मीठ गरजेनुसार

 

फोडणीसाठी:

१) १ छोटा चमचा मोहरी

२) १ छोटा चमचा  जिरे

३) १ चिमुठभर हींग

५) ७-८ कढीपत्त्याची पाने

 

खडा मसाला:

                    

१) २ तमालपत्र

२) १ काळी वेलची

३) २-३ काली मीरी

४) १ दालचीनी

५) २ लवंगा

६) ३-४ लाल मिरची

७) २ हिरव्या वेलच्या

 

 

मसाले: 

 

१) १/४ छोटा चमचा लाल मिरची पूड

२) १/४ छोटा चमचा गरम मसाला पूड़

३) १/२  छोटा चमचा जिरे पूड

४) १ छोटा चमचा धणे पूड

५) चिमुठभर हींग

 

पालकाची पेस्ट 

 

१) १ छोटी जुडी पालक

२) १/२ कप पुदिन्याची पान

३) १/२ कप कोथींबीर

४) २ हिरव्या मिरच्या

 

 

कृती:
पालक, पुदिन्याची पान, कोथिंबीर व हिरव्या मिरच्या धुवून बारीक़ चिरून घ्या.

 

तांदूळ धुवून पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवावे.

 

पालक, पुदिन्याची पान, कोथिंबीर व हिरव्या मिरच्या एकत्र करून बारीक़ पेस्ट करून घ्या.

 

एका जाड़ बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेचच जिरे, हींग व कढीपत्त्याची पाने घालावी.

 

लगेचच खडा मसाला घालून परतावा.

 

लगेचच उभा चिरलेला कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा.

 

लाल झालेला कांदा थोडासा बाजूला करून ठेवावा म्हणजे सजावटीसाठी वापरता येईल.

 

कांदा परतून झाला की पुदिन्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतावी व तांदुळ घालून ५ मिनिटे परतावे.

 

गरम पाणी त्यावर घालून झाकण ठेवून १० मिनिटे मंद ग्यासवर भात शिजू दयावा.

 

सर्विंग बाउल मध्ये शिजलेला भात काढून घ्या त्यावर कोथिंबीर व तळलेला कांदा घालून गरमच कोशिंबीरीसोबत सर्व्ह करा.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *